- Get link
- X
- Other Apps
Posts
कॉलेजचा पहिला दिवस
- Get link
- X
- Other Apps
कॉलेजचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक अस्मरणीय आणि उत्साहाचा सण असतो. नवीन मित्र प्राध्यापक वातावरण आणि कॅम्पस पाहण्याची उत्सुकता सोबतच रॅगिंगची भीती व नवीन जबाबदारीची जाणीव अशा संमिश्र भावना या दिवशी मनात असतात. हा दिवस आयुष्यातील एक नवीन आणि स्वतंत्र टप्पा सुरू करतो. नवीन वातावरणाविषयी उत्सुकता आणि थोडी धाकधूक असते. मित्र मिळतील की नाही, या विचाराने मनात गोंधळ असू शकतो. अनेक नवीन चेहरे भेटतात.आपल्या आवडीनिवडीचे नवीन मित्र शोधण्याचा हा दिवस असतो. अनेक कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी फ्रेशर्स साठी ओरिएंटेशन कार्यक्रम असतो, जिथे कॉलेजचे नियम आणि सुविधांची माहिती दिली जाते. शालेय जीवनापेक्षा वेगळे असे हे कॉलेजचे आयुष्य जबाबदारीचे आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देते. कॉलेजमधील माझ्या पहिल्या दिवसाने मला खूप उत्साह आणि अशा मिळाली. माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली,जी अनंता शक्यतांनी भरलेली होती. त्यादिवशी मला माहित होते की मी एका अनुभवांच्या उंबरठ्यावर आहे जो केवळ माझ्या शैक्षणिक भविष्या...
रायगड
- Get link
- X
- Other Apps
रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाडजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला एक इतेहासिक किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये या किल्ल्यावर आपला राजाभिषेक करून घेतला आणि या किल्ल्यावर आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी बनवले | हा गड समुद्र सपाटीपासून सुमारे १,३५६ मीटर (४,४४९ फूट) उंचीवर असून , तो एका अभेद्य गिरिदुर्गचे उत्तम उदाहरण आहे. १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी चंद्राव मोरे यांच्याकडून हा किल्ला जिंकून घेतला, ज्याला पूर्वी 'रायरी ' असे नाव होते. हिरोजी इंदुलकर यांनी या किल्याची बांधकामे केली | शिवाजी महाराजांनी या गडावर राजधानी स्थापना करून स्वराज्याचा विस्तार केला आणि इथूनच राज्यकारभार केला | मला आणि माझ्या मैत्रिणींना रायगडावर जाण्यासाठी खूप जास्त इच्छा होती. आम्ही एक दिवस ठरवल की आपण रायगडावर जाऊन येणारच. तर एक दिवस आम्ही रायगडावर जायचं आहे ठरवून आणि आम्ही रायगडावर गेलो. आम्ही सगळ्यांनी रायगड ला जायला एक गाडी केली आणि आम्ही ५ जणी मैत्रिणी गेलो. आम्ही तिथे सगळी जाण्य...
होळी
- Get link
- X
- Other Apps
होळी हा फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जाणारा हिंदू धर्मातील प्रमुख रंगोत्सव आणि वसंत ,ऋतूचे स्वागत करणारा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून होळी पेटवली जाते, ज्याना होलिका दहन म्हणतात, आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते.ज्यात एकमेकांना रंगव गुलाल लावून आनंद व्यक्त केला जातो राजा हिरण्यकश्यपूची बहिण होलिका हिने भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी स्वतःला अग्नीत जाळन्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिले आणि हो लिका जळून खाक झाली, या कथेवरून होळी साजरी केली जाते तर आमच्या येथे होळी रात्री १२:०० लावली जाते रात्री होळीची पुजा करतात गावातल्या सर्व महिला होली जवळ पाच प्रकारचे सन घेऊन होळी ची पूजा करतात. फेण्या, पुरणपोळी, करंजी, पुऱ्या ,शंखरपाळ्या, मोदक असे पदार्थ करतात.तर पुजेसाठी नारळ हार बागंड्या, साखरे ची माळ हे सगळ वापरून पुजा केली जाते. मग १२:०० वाजता होळी पेटवून नारळ अर्पण केला जातो .आणि आमच्या कडे प्रदर्शना घालतात. आणि मग होलीचे दहन होतो. मग आमच्याकडे होळीचा दहन झाला की रंग-पंचमी साजरी केली जाते.
आई एकवीरा दर्शन
- Get link
- X
- Other Apps
आई एकवीरा ही लोणावळा जवळील कार्ला लेणी येथे स्थित एक जागृत दैवत असून महाराष्ट्रातील आगरी कोळी आणि अनेक समाजाची कुलस्वामिनी आहे.हे मंदिर स्वयंभू असून,पौराणिक कथेनुसार पांडवानी उभारल्याचे मानले जाते! रेणुका मातेचा अंश मानल्या जाणाऱ्या देवीला नवसाला पावणारी म्हणून खूप मान्यता आहे. आगरी कोळी आणि काही प्रमाणात कायस्थ प्रभू समाजाची कुलदेवता पांडवानी वनवासाच्या काळात या मंदिराची उभारणी केली. असे मानले जाते नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध, भक्तांची गर्दी नवरात्रीत विशेष असते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत एकवीरा देवीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे आणि ते प्राचीन कार्ला लेण्यांमध्ये आहे. एकवीरा देवी ही एक शक्तिशाली आणि महत्त्वाची देवी आहे, जी महाराष्ट्राच्या परंपरेत खोलवर रुजलेली आहे. आम्ही आमच्या गावातील सर्वजण आई एकविरेच्या दर्शनाला सोबत जातो तेव्हा खूप मज्जा येते आम्ही आमच्या गावातील सर्व मुला मुली इको करून जातो. आणि सर्वजण खूप मज्जा करतो, गाडीत जाताना एकविरेची गाणी लावून नाचत गायत जातो. मग लगे...
आमच्या घरातील रक्षाबंधन
- Get link
- X
- Other Apps
रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे सुरक्षेचे बंधन आहे. जिथे बहिण भावाच्या दिर्घायुष्यासाठी आणि सुग्रासगि प्रार्थना करते आणि भाऊ तिच्या आयुष्यभर संरक्षण देण्याचे वचन देतो. हा सण भाऊ - बहिणीच्या प्रेमळ नात्याचा आणि विश्वासाचा उत्सव आहे ज्यामध्ये पवित्र धागा पुरते मर्यादित नसून परस्पर प्रेमाच्या लागि प्रेरणाच्या भावनेचत्रि प्रतिक आहे जसे द्रौपदीचे राखी पाठवली होते, रानी कर्णावतीने कुमारांना दिसून येते, या कशांमधून हे दिसून येते रक्षाबंधन हा सण भाऊ - बहिणीच्या नात्यातील प्रेम, आयुष्यासाठी आणि विश्वास वाढवतो. आमच्या घरातील रक्षाबंधन खूप आनंद असतो कारण रक्षाबंधन च्या आगोदर आम्ही बहिणी राखी खूप उत्साहाने घ्यायची ते ठरवतो आणि मग रात्री घ्यायला आगोदर आम्ही बहिणी राखी आरती ची थाली, फुलाने सजवतो. सोबत जातो, मग आरती च्या दिवशी आमच्या रक्षाबंधन च्या आमच्या बाबांच्या बहिणी देखील घरी येतात. मग आम्ही सगळ्या जनी भाऊ च्या मनगटावर राखी बांधतो मग भाऊ आम्हाला भेटवस्तू देतो आणि आमचे रक्षण करण्याचे वचन देतो. म्हणतो, की, नाई तुझ्यावर ही संकट आल तरी मी तुझ्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे. आणि मग आपण देखील म्हणतो की दादा ज...