कॉलेजचा पहिला दिवस

 कॉलेजचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक अस्मरणीय आणि उत्साहाचा सण असतो. नवीन मित्र प्राध्यापक वातावरण आणि कॅम्पस पाहण्याची उत्सुकता सोबतच रॅगिंगची भीती व नवीन जबाबदारीची जाणीव अशा संमिश्र भावना या दिवशी मनात असतात. हा दिवस आयुष्यातील एक नवीन आणि स्वतंत्र टप्पा सुरू करतो. 

        नवीन वातावरणाविषयी उत्सुकता आणि थोडी धाकधूक असते. मित्र मिळतील की नाही, या विचाराने मनात गोंधळ असू शकतो. अनेक नवीन चेहरे भेटतात.आपल्या आवडीनिवडीचे नवीन मित्र शोधण्याचा हा दिवस असतो. अनेक कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी फ्रेशर्स साठी ओरिएंटेशन कार्यक्रम असतो, जिथे कॉलेजचे नियम आणि सुविधांची माहिती दिली जाते. 

       शालेय जीवनापेक्षा वेगळे असे हे कॉलेजचे आयुष्य जबाबदारीचे आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देते. कॉलेजमधील माझ्या पहिल्या दिवसाने मला खूप उत्साह आणि अशा मिळाली. माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली,जी अनंता शक्यतांनी भरलेली होती. त्यादिवशी मला माहित होते की मी एका अनुभवांच्या उंबरठ्यावर आहे जो केवळ माझ्या शैक्षणिक भविष्यालाच नव्हे तर एक व्यक्ती म्हणून मी कोण बनणार आहे हे देखील घडवेल.

Comments

Popular posts from this blog

आमच्या घरातील रक्षाबंधन

आई एकवीरा दर्शन