रायगड
रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाडजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला एक इतेहासिक किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये या किल्ल्यावर आपला राजाभिषेक करून घेतला आणि या किल्ल्यावर आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी बनवले | हा गड समुद्र सपाटीपासून सुमारे १,३५६ मीटर (४,४४९ फूट) उंचीवर असून , तो एका अभेद्य गिरिदुर्गचे उत्तम उदाहरण आहे.
१६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी चंद्राव मोरे यांच्याकडून हा किल्ला जिंकून घेतला, ज्याला पूर्वी 'रायरी ' असे नाव होते. हिरोजी इंदुलकर यांनी या किल्याची बांधकामे केली | शिवाजी महाराजांनी या गडावर राजधानी स्थापना करून स्वराज्याचा विस्तार केला आणि इथूनच राज्यकारभार केला |
मला आणि माझ्या मैत्रिणींना रायगडावर जाण्यासाठी खूप जास्त इच्छा होती. आम्ही एक दिवस ठरवल की आपण रायगडावर जाऊन येणारच. तर एक दिवस आम्ही रायगडावर जायचं आहे ठरवून आणि आम्ही रायगडावर गेलो. आम्ही सगळ्यांनी रायगड ला जायला एक गाडी केली आणि आम्ही ५ जणी मैत्रिणी गेलो. आम्ही तिथे सगळी जाण्यासाठी निघालो. आणि आम्ही तिथे पोहचलो. आम्हाला तिथे गेल्यावर एवढ भारी वाटलं. मग आम्ही पायऱ्या चढायला लागलो पाय दुखायला लागले पण किल्ला वर जायची इच्छा काही कमी होत नव्हती. जसे जसे वर जात होतो. तसतसे समजत होते की त्या काळातली लोक किती सक्षम होती. त्या काळात वाहतूकीची साधने नसताना सतत गडावर चढ - उतर करणे किती कठीण असेल. भरपूर वेळ चढल्यानंतर महा दरवाजा दिसला. मग मनाला वाटल की आपण आता गडावर पोहचलो आणि आम्ही सगळ्यांनी फोटो काढले. मग परत आम्ही वर जायला निघालो हसत-खेळत आम्ही गडावर पोहोचलो. तिथे जाऊन पहिले आम्ही पूर्ण रायगड किल्ला पाहिला आणि तिथे जाऊन माझ्या मनाला एवढ सुख भेटलं. की मी काय सांगू मला तर खूप भारी वाटल तिथे जाऊन अस वाटत होत की तिथून यावच नाही. मग आम्ही तिथे खूप मज्जा केली आणि मग आम्ही घरी जायला निघालो.
Comments
Post a Comment