होळी



होळी हा फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जाणारा हिंदू धर्मातील प्रमुख रंगोत्सव आणि वसंत ,ऋतूचे स्वागत करणारा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून  होळी पेटवली जाते, ज्याना होलिका दहन म्हणतात, आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते.ज्यात एकमे‌कांना रंगव गुलाल लावून आनंद व्यक्त केला जातो

राजा हिरण्यकश्यपूची बहिण होलिका हिने भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी स्वतःला अग्नीत जाळन्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिले आणि हो लिका जळून खाक झाली, या कथेवरून होळी साजरी केली जाते 

तर आमच्या येथे होळी रात्री १२:०० लावली जाते रात्री होळीची पुजा करतात गावातल्या सर्व महिला होली जवळ पाच प्रकारचे सन घेऊन होळी ची पूजा करतात. फेण्या, पुरणपोळी, करंजी, पुऱ्या ,शंखरपाळ्या, मोदक असे पदार्थ करतात.तर पुजेसाठी नारळ हार बागंड्या, साखरे ची माळ हे सगळ वापरून पुजा केली जाते. मग १२:०० वाजता होळी पेटवून नारळ अर्पण केला जातो .आणि आमच्या कडे प्रदर्शना घालतात. आणि मग होलीचे दहन होतो. मग आमच्याकडे होळीचा दहन झाला की रंग-पंचमी साजरी केली जाते.

Comments

Popular posts from this blog

आमच्या घरातील रक्षाबंधन

आई एकवीरा दर्शन

कॉलेजचा पहिला दिवस